वारीच्या बसमध्ये पहिल्यांदाच ‘जीपीएस’ प्रणाली; एसटी महामंडळाचा पायलट प्राेजेक्ट

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या माेजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत साेमवारी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर (Pandharpur) येथे प्रस्थान ठेवले. १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस (Shivshahi buses) रवाना करण्यात आल्या.

  मुंबई (Mumbai).  काेराेनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या माेजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत साेमवारी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर (Pandharpur) येथे प्रस्थान ठेवले. १० पालख्यांसाठी २० शिवशाही बसेस (Shivshahi buses) रवाना करण्यात आल्या. पण त्याचबराेबर एसटी महामंडळाने (the ST Corporation) यंदा पहिल्यांदाच या मानाच्या पालख्यांच्या बसेसमध्ये जीपीएस प्रणाली लावली.

  जीपीएस प्रणाली एसटी महामंडळाचा पायलट प्राेजेक्ट असल्याचे बाेलले जात आहे. येत्या काही दिवसात मंडळातील सर्वच बसेसमध्ये जीपीएस प्रणाली सुरु केली जाणार असल्याचे संकेत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

  वारी साेहळ्यावर यंदाही काेराेनाचे सावट कायम आहे. आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्यात आल्या. या पालख्यांसाठी एसटी महामंडळाने माेफत शिवशाही बस दिल्या आहेत. साेमवारी सकाळी १० पालख्यांसह २० शिवशाही बस श्री क्षेत्र पंढरपूरला रवाना झाल्या. आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी, देहू येथून संत तुकारामांची पालखी, सासवड वरून संत सोपान काकांची पालखी, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची पालखी, मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाईची पालखी, पैठण येथून संत एकनाथांची पालखी, पिंपळनेर-पारनेर येथून संत निळोबारायांची पालखी कौंडिण्यपूर (अमरावती) येथून रुक्मिणी माता यांची पालखी व पंढरपूर येथून संत नामदेव महाराज यांची पालखी अशा दहा मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे साेमवारी संध्याकाळी सुर‌क्षित पोहोचल्या.

  आता प्रवाशांना कळणार लाेकेशन !
  यंदा पहिल्यांदाच एसटी महामंडळाने मानाच्या पालख्या घेवून जाणाऱ्या शिवशाही बसेसना जीपीएस प्रणाली लावण्यात आली असून मुंबईत बसलेल्या एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बसेसचे लाईव्ह लाेकेशन वेळाेवेळी समजत असणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार स्थानिक प्रशासनाला याबाबत मार्गदर्शन केले जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एसटी महामंडळाने हा प्रयाेग पहिल्यांदा करत असले तरीही भविष्यात सर्व एसटीना जीपीएस प्रणाली बराेबर जाेडले जाणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहे.

  महामंडळ हायटेक
  ‘संत समागम एखादिये परी’ या संत वचनांची अनुभूती देत यंदा एसटी महामंडळाने ज्ञानोबामाऊली आणि तुकाराम महाराजांसह सर्वच पालख्यांच्या प्रस्थानाचे फेसबुकद्वारे लाइव्ह प्रक्षेपण केले. यामुळं असंख्य विठूरायांच्या भक्तांसह वारकऱ्यांनाही पालख्यांचे ‘याची देही याची डाेळा’ याचे साक्षीदार होण्याची जणू संधीच दिली.