दहावीच्या परीक्षांविषयी जीआर काढणार, पण अकरावी प्रवेशाच काय होणार?

अकरावीचे प्रवेश कसे होणार यासंदर्भात दुसरा जीआर राज्य सरकार काढणार आहे. शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी काल आणि आज दोन दिवस राज्याच्या महाधिवक्ता बरोबर चर्चा केल्याची माहिती आहे. या दोन्ही जीआरची माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली जाणार आहे.

    मुंबई: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयानंतर त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. दहावी परिक्षा संदर्भात शिक्षण विभाग १ ते २ दिवसात महत्त्वाचा जीआर काढणार आहे. त्यामध्ये दहावी च्या विद्यार्थ्यांना कसं उत्तीर्ण करायचं याबाबतचे सर्व निकष ठरवणारा एक जीआर राज्य सरकार काढणार आहे.