पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणुक; भाजपच्या उमेदवारांना रामदास आठवलेंचा पाठिंबा

तीन पदवीधर मतदारसंघ आणि एका शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढत असलेल्या भाजप च्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

मुंबई : रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale) यांनी  पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत(Graduate and Teacher Constituency Elections) भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. एका परिपत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली.

१ डिसेंबर रोजी या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा आठवलेंनी केली.

तीन पदवीधर मतदारसंघ आणि एका शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढत असलेल्या भाजप च्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे.

औरंगाबादमध्ये शिरीष बोराळकर, पुण्यात संग्राम देशमुख, नागपुरात संदीप जोशी, अमरावतीमध्ये डॉ. नितीन धांडे हे  भाजपचे उमेद्वार निवडणुक रिंगणात उतरले आहेत.