जानेवारीत होणार ग्रामपंचायतच्या निवडणुका ; सरपंच निवडीबाबत ‘हा’ होणार निर्णयाक बदल!

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक वेळी सरपंचपदाची आरक्षण सोडत ही आधी होत असते. पण यात होणारा घोडेबाजार, खोटी जातप्रमाणपत्र दाखवण्याचे प्रकारांना आळा घालण्यासाठी यावेळी जानेवारी महिन्यात सोडत काढण्यात येणार आहे.

मुंबई : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबलेल्या पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा (Gram Panchayat election) कार्यक्रम जाहीर झाला आहे.  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक वेळी सरपंचपदाची आरक्षण सोडत ही आधी होत असते. पण यात होणारा घोडेबाजार, खोटी जातप्रमाणपत्र दाखवण्याचे प्रकारांना आळा घालण्यासाठी यावेळी जानेवारी महिन्यात सोडत काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

सरपंचपदाची आरक्षण(Reservations) सोडत ही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्ण केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ८ जिल्ह्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. पण, आता राज्य सरकारने आरक्षण सोडत निर्णयात बदल केल्यामुळे सरपंच निवडीचा निर्णयही रद्द झाला आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाक बदलामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम होणार आहे.

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२०या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या १४२३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारीला होईल आणि १८ जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

१५ डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील

२३ ते ३० डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी

३१ डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी

४ जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी

१५ जानेवारी मतदान

१८ जानेवारी मतमोजणी

३१ डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल चार जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ४ जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल आणि १५ जानेवारी रोजी सकाळी साडे सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होईल. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.