म्हणतात ना वयाला बंधंन नसते! नातीसोबत आजोबांनी केला भन्नाट डान्स अन् व्हिडिओ झाला तुफान व्हायरल…

आजोबांचे वय झालेले असले तरी त्यांच्या मनातील तारुण्य अजूनही टिकून आहे. आपल्या नातीसोबत ते मजेत डान्स करत आहेत. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

  मुंबई : सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि प्रतिसाद देखील मिळतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ आज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण मुलगी आपल्या आजोबांसोबत मजेदार डान्स करताना दिसत आहे.

  काय आहे या व्हिडिओमध्ये ?

  सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगी आपल्या आजोबांसोबत डान्स करताना दिसत आहे. माय बेस्टी या इंग्रजी गाण्यावर आजोबा तसेच तरुण मुलगी असे दोघेही थिरकत आहेत. मुलगी जसा डान्स करेल अगदी तसाच डान्स करण्याचा प्रयत्न आजोबा करत आहेत. दोघेही गाण्याच्या चालीवर थिरकत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Divesha bajaj🦋 (@dsbajaj236)

  दरम्यान, आजोबांचे वय झालेले असले तरी त्यांच्या मनातील तारुण्य अजूनही टिकून आहे. आपल्या नातीसोबत ते मजेत डान्स करत आहेत. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.