Corona spread rapidly in the Diwali crowd with the number of new patients increasing after a month the mortality rate also increasing

मुंबई : मंगळवारी राज्यात ४,०२६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, कोरोना मृत्यूसंख्येत घट झाली असल्याचे दिसून येत आहे. रुग्ण बरे होवून घरी जाणाऱ्या संख्येतही राज्यात वाढ झाली आहे.

आज राज्यात ५३ कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,५९,३६७ झाली आहे. आज ६,३६५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण १७,३७,०८० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ % एवढे झाले आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ७३,३७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात मंगळवारी राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ५३ मृत्यूपैकी ठाणे मंडळ -७, नाशिक – ५, पुणे मंडळ – २०,  कोल्हापूर- ५,  औरंगाबाद -०१, लातूर- ०२, अकोला -०१, नागपूर-१२ अशी नोंद करण्यात आली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१३,७७,०७४ प्रयोगशाळा नुमन्यांपैकी १८,५९,३६७ (१६.३४ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४८८,९६१ व्यक्ती होमक्वारंटाईन असून ५,६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.