रेल्वेप्रवाशांना मोठा दिलासा, युनिव्हर्सल पासची नियमावली लागू होणार? : जाणून घ्या सविस्तर

युनिव्हर्सल कोड प्रणाली अद्याप लागू झाली नसली, तरीही आरोग्यकर्मचाऱ्यांना प्रवास करताना त्यासंदर्भात अनेकदा विचारणा केली जाते. यावर तोडगा म्हणून सरकारने ही प्रणाली लागू होत नाही, तोपर्यंत अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीनुसार प्रवास करण्यासाठी संमती दिली आहे. मात्र, त्यासाठी ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे. दरम्यान १४ जून रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भात सरकारने चर्चा करुन प्रमाणित नियमावली तयार केली असून, ती लवकरच लागू होणार असल्याचे खात्रीदायकरित्या कळते. करोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या निर्बंधांच्या निकषानुसार युनिव्हर्सल प्रवास पासपद्धती निश्चित केली जाणार आहे.

    मुंबई : युनिव्हर्सल कोड प्रणाली अद्याप लागू झाली नसली, तरीही आरोग्यकर्मचाऱ्यांना प्रवास करताना त्यासंदर्भात अनेकदा विचारणा केली जाते. यावर तोडगा म्हणून सरकारने ही प्रणाली लागू होत नाही, तोपर्यंत अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीनुसार प्रवास करण्यासाठी संमती दिली आहे. मात्र, त्यासाठी ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे.

    दरम्यान १४ जून रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भात सरकारने चर्चा करुन प्रमाणित नियमावली तयार केली असून, ती लवकरच लागू होणार असल्याचे खात्रीदायकरित्या कळते. करोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या निर्बंधांच्या निकषानुसार युनिव्हर्सल प्रवास पासपद्धती निश्चित केली जाणार आहे. या नियमांमुळे गरज असले प्रवासी प्रवास करू शकतील. ज्यांना प्रवासाची मुभा आहे त्यांनी प्रवास करताना स्थानिक, राज्य व केंद्र सरकारने दिलेले ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे. युनिव्हर्सल प्रवास पास हा निर्बंध लावलेल्या क्षेत्रांच्या स्तराप्रमाणे देण्यात येणार आहे. अधिक खात्री करून घेण्यासाठी या पासवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करून कोणत्याही मोबाइलच्या वा क्यूआर कोड रिडरच्या माध्यमातून स्कॅन करून तपासण्यात येईल.

    तसेचं ओळखपत्र वा इतर मान्यताप्राप्त कागदपत्रांशिवाय प्रवास करणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. खोटे ओळखपत्र दाखवून प्रवास करणाऱ्यास रेल्वेपोलिसांच्या ताब्यात देण्यात येण्याचा निर्णयही या नियमावलीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. नव्या पद्धतीने पास लागू करण्याची तारीख रेल्वे प्रशासनास कळवण्यात येणार असून तोपर्यंत मुभा असलेले प्रवासी जुन्या पद्धतीप्रमाणे प्रवास करू शकतात.

    रेल्वेने ज्या बाहेरील संस्थाची मदत घेतली आहे त्यांच्याकडे सरकारी ओळखपत्रे नाहीत, त्यांनाही पासप्रणाली देण्याबद्दल विचारात घेण्यात येणार आहे. रेल्वेस्थानकांवर अनेक ठिकाणी प्रवेशद्वारे असल्यामुळे रेल्वेपोलिसांनी मदतीसाठी स्थानिक पोलिसांना घ्यावे तसेच क्यूआर कोडची तपासणी ही गर्दीच्या वेळी तिकिटकेंद्रावर करणे शक्य होणार नाही त्यामुळे प्रवासादरम्यान किंवा फलाटावर याची तपासणी करण्यात येणार आहे.पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आरोग्यकर्मचाऱ्यांकडे अद्याप नवीन पास प्रणाली आलेली नाही ते पूर्वी ठरलेल्या पासपद्धतीप्रमाणे प्रवास करतात असे सांगितले.