कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात हॉटेल, पर्यटन क्षेत्राला मोठा दिलासा

पर्यटन संचालनालयाकडून ( Directorate of Tourism)  मार्गदर्शक (Guidelines ) सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच मिशन बिगीन अगेननुसार (Mission Begin Again), आदरातिथ्य़ क्षेत्र सूरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरून ही काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मुंबई: राज्यात कंटेन्मेंट झोन ( Containment Zone) वगळता इतर भागातील हॉटेल्स (Hotels) , पर्यटन केंद्र (Tourism Center) , बी अँड ब्रेकफास्ट (B and Breakfast) आणि रिसॉर्टसच्या (Resort) व्यवसायांना परवागनी देण्यात आली आहे. पर्यटन संचालनालयाकडून       ( Directorate of Tourism)  मार्गदर्शक (Guidelines ) सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच मिशन बिगीन अगेननुसार (Mission Begin Again), आदरातिथ्य़ क्षेत्र सूरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यास अनुसरून ही काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने परिपत्रकातून हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना दिलासा देण्यात आला आहे.

नियमांचे करावे लागणार पालन: नायर

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यातील प्रमुख हॉटेल असोसिएशन्सने पत्राद्वारे व्यवसायादरम्यान बंधनकारक सूचना कळविण्यात आल्या आहेत. कोरोना रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या अनुषंगाने शासनाने निश्चित केलेल्या नियमास अनुसरून कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डिजिटल व्यवहाराला द्यावे लागणार प्राधान्य

हॉटेल्स आणि रिसॉर्ट यांना सर्व प्रवाशांच्या तापमानाची नोंद घ्यावी लागेल. कोरोनाची लक्षणे नसलेल्या पर्यटक तथा प्रवाशांनाच प्रवेश देता येईल. तसेच सेवा देताना वेटींग रूम आदी सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबींसाठी संबंधित प्रवाशाची माहिती प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधित प्रवाशाची परवानगी घ्यावी लागेल. प्रवाशांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व आवश्यक ठिकाणी हॅन्ड सॅनिटायजर ठेवाने लागणार आहे. चलनाची हाताळणी करताना योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्याला प्राधान्य द्यावे.