तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे राज्य सरकारला आदेश, हाय कोर्टाकडून वानखेडेंना मोठा दिलासा

तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करण्यास हायकोर्टानं राज्य सरकारला मनाई केली आहे. आलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून वानखेडे यांच्या विरोधात अटकेची कारवाई करायची असेल तर त्यांना त्याची ३ दिवस आधी नोटीस देणं राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना बंधनकारक असणार आहे. असे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

    मुंबई: मुंबई ड्रग्स प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेटवरून आता वाद टोकाला गेला आहे. चौकशी करायचीच असेल तर CBI किंवा NIAनं करावी, अशी मागणी आता समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे.