नवरीच्या गळ्यात हार घालताच नवरदेवाचा निसटला पायजमा; सगळ्यांसमोर उडाली फे…फे अन् व्हिडिओ झाला Viral

नवरदेवाचा पायजमा निसटलेला पाहून नवरीला देखील हसू आवरत नाही. विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकजण पोट धरून हासतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप जास्त आवडला आहे.

  मुंबई : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडिओ हे चांगलेच मजेदार असतात. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरीला हार घालतो त्याचवेळी नवरदेवाचा पायजमा निसटतो. मात्र, हे नवरदेवाला कळतच नाही. पायजमा निसटला आहे हे नवरी नवरदेवाला इशारा करून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झालेला दिसतो आहे.

  व्हिडीओमध्ये आहे काय?

  नवरदेवाचा पायजमा निसटलेला पाहून नवरीला देखील हसू आवरत नाही. विशेष म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकजण पोट धरून हासतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप जास्त आवडला आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक करत कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये एका युजर्सने कमेंट करताना लिहिले आहे की, व्हिडिओ बघिल्यानंतर मी स्वत: ला हसण्यापासून रोखू शकलो नाही.

  पाहा व्हिडिओ

  अशाप्रकारचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच बघितला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ‘official_niranjanm87’ नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

  त्यामध्ये लग्न सोहळ्यात अनेक लोक जमलेले होते. मंडपात नवरदेव आपले मित्र तसेच नातेवाईक यांच्यासोबत बसला होता. नवरेदवाचा शाही थाट पाहण्यासारखा होता. मात्र, त्यावेळी तो नवरदेव शांत बसलेला नव्हता तर भर मंडपात तो नवरदेव थेट तंबाखू चोळत होता आणि खात होता. तो व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

  groom pajamas came off during varmala ceremony video goes viral on social media