कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जीसबी गणेशोत्सव मंडळाचा यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय

मुंबई: यावर्षीचा गणेशोत्सव २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील एका प्रमुख गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाच्या स्थगितीचा निर्णय घेतला आहे. जीएसबी गणेशोत्सव

मुंबई: यावर्षीचा गणेशोत्सव २२ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुंबईतील एका प्रमुख गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सवाच्या स्थगितीचा निर्णय घेतला आहे. जीएसबी गणेशोत्सव समितीचे सचिव ट्रस्टी मुकुंद कामत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. यावर्षी वडाळा भागात जीसबी गणेशोत्सव समिती हा सण साजरा करणार नाही. पुढच्या वर्षी माघी चतुर्थीला हा गणेशोत्सव साजरा करणार असल्याचेही कामत यांनी स्पष्ट केले. गेल्या ६५ वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करणारी जीएसबी गणेशोत्सव समिती ही शहरातल्या श्रीमंत आणि प्रसिद्ध मंडळांपैकी एक आहे. या समितीतर्फे दरवर्षी १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. या मंडळाच्या उत्सवात हजारो लोक सहभागी होत असतात. मात्र यंदा यात खंड पडणार आहे.