हॉटेल चालक, व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी विचार सुरु : पालकमंत्री अस्लम शेख

कोरोना संकटापूर्वी कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोना काळात कित्येक लोकांचं नुकसान झालं, याला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारचा नियोजनशुन्य कारभार यातून दिसून आल्याची टीका शेख यांनी केलीय.

    मुंबई :  हॉटेल, कापड उद्योग, व्यापाऱ्यांना कशाप्रकारे सुविधा द्यायच्या यावर सरकार विचार करत असल्याचा दावा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलाय. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून कोरोना लसीचा पुरेसा साठा मिळत नसल्यामुळे अनलॉकचा निर्णय पूर्णपणे अमलात येऊ शकत नसल्याचंही शेख यांनी म्हटलंय.

    राज्याला लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. पण केंद्राकडून लसीचा पुरेसा साठा मिळत नाही. खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध होते. मात्र, सरकारी रुग्णालयांना लस मिळत नाही. देशात ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तिथे अशीच स्थिती असल्याचा आरोपही अस्लम शेख यांनी केलाय.