Gujarati language announcement at CSMT station; Awareness among railway passengers

मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकातून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात त्यातील अनेक प्रवासी वेगळ्या जाती प्रांतातील असल्याने त्यांना रेल्वे स्थानकातील उद्घोषणा अनेकदा समजत नसल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या संकल्पनेतून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसह आता गुजराती भाषेत देखील उद्घोषणा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकातून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात त्यातील अनेक प्रवासी वेगळ्या जाती प्रांतातील असल्याने त्यांना रेल्वे स्थानकातील उद्घोषणा अनेकदा समजत नसल्याचे समोर आले आहे. याची दखल घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत यांच्या संकल्पनेतून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसह आता गुजराती भाषेत देखील उद्घोषणा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

    याअंतर्गत मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेतील रेल्वे प्रवाशांच्या माहितीकरिता व जनजागृतीसाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकातील धन्यवाद गेट येथे सीएसएमटी लोहमार्ग पोलीस हवालदार हनुमंत धाइंजे हे मेगा फोनद्वारे उद्घोषणा करून अत्यावश्यक सेवेतील रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती करत आहेत.