Gulabrao Patil and Eknath Khadse, fierce rivals in politics, came together! The visit took place after 20 years

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. जळगाव जिल्हा बँकेवर सध्या खडसे यांचे वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर, पाटील यांनी नुकतीच खडसेंच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, खडसे यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी पाटील यांची खेळी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

    मुंबई : राजकारणातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले राज्याचे पाणी पुरवठा मंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात दिलजमाई झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. 20 वर्षात पहिल्यांदाच पाटील हे खडसेंच्या मुंबईतील घरी गेले. यावेळी दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या भेटीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवादही साधला. खडसेंना शह देण्याची या मागची कोणतीही खेळी नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

    जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. जळगाव जिल्हा बँकेवर सध्या खडसे यांचे वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर, पाटील यांनी नुकतीच खडसेंच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. दरम्यान, खडसे यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी पाटील यांची खेळी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.

    या बाबत पत्रकारांनी थेट पाटील यांना प्रश्न विचारला असता, खडसेंना शह देण्याची कोणतीही खेळी नाही, जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. यासाठीच आपण गेल्या 20 वर्षात प्रथमच खडसे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी गेलो होतो, असे पाटील म्हणाले.