gupteshwar pande

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar pande) यांच्याविरोधातही शिवसेना उमेदवार देणार आहे. महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण बदनाम करण्यात आले. लोकांना कळत आहे यामध्ये आमच्यापैकी कोणाचा काहीही संबंध नव्हता.

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे (bihar assembly election 2020) बिगुल वाजले आहे. आता निवडणुकीला (election) काही आठवड्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सध्या सर्वच पक्षांतील उमेदवारांच्या (Candidate) नावांची घोषणा करण्याची लगबघ सुरु झाली आहे. तर यामध्ये आता शिवसेनेने (Shivsena) पण उडी घेतली आहे. शिवसेनाा बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागा लढवणार आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteshwar pande) यांच्याविरोधातही शिवसेना उमेदवार देणार आहे. महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात विनाकारण बदनाम करण्यात आले. लोकांना कळत आहे यामध्ये आमच्यापैकी कोणाचा काहीही संबंध नव्हता. तरीही सूडबुद्धीचे राजकारण केले गेले. आता आम्ही बिहार निवडणूक लढवून याची परतफेड करणार आहोत. आम्ही बिहार निवडणुकीत ५० जागा लढवत आहोत. २०१५ ला शिवसेना बिहारमध्ये निवडणूक लढली होती, ज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त मते शिवसेनेने घेतल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी पदाचा राजीनामा देऊन जेडीयूमध्ये प्रवेश केलाआहे. अनिल देसाई यांनी गुप्तेश्वर पांडेंविरोधात उमेदवार देणार असल्याचे सांगितले. जदयूच्या तिकीटावर गुप्तेश्वर पांडे बक्सर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. डीजीपी पदावरचा माणूस कसा बोलत होता, त्याचा अभिनय कसा होता, हे सर्वांनी पाहिले होते. या पदावर राहून असे वक्तव्य करणे हे पांडेंना न शोभणारे होते. पण त्यांना आमचा मावळा टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. पांडेंना महाराष्ट्राची ताकद कळेल, आम्ही त्यांच्यासमोर उमेदवार देत असल्याचे अनिल देसाई म्हणाले.