दादर-भुज एक्सप्रेसमधून गुटखा तस्करी करणाऱ्यांना अटक; २ लाख ६६ हजारांचा गुटखा जप्त

दादर-भुज एक्सप्रेसमधून गुटखा, पानमसाल्याची तस्करी करणाºया तीन जणांना अटक करण्यात आली. सदर कारवाई मुंबई लोहमार्ग सेंट्रल पोलिसांनी शुक्रवारी केली. या कारवाईत २ लाख ६६ हजार ४७२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

    मुंबई :  दादर-भुज एक्सप्रेसमधून गुटखा, पानमसाल्याची तस्करी करणाºया तीन जणांना अटक करण्यात आली. सदर कारवाई मुंबई लोहमार्ग सेंट्रल पोलिसांनी शुक्रवारी केली. या कारवाईत २ लाख ६६ हजार ४७२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

    पश्चिम लोहमार्गावरील दादर स्थानकात येणाऱ्या मेल, एक्सप्रेसमध्ये वाढणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी फलाट क्रमांक ७ वर दादर-भुज एक्सप्रेस आली. या एक्सप्रेसमधून उतरलेले तीन इसम बॅगा घेऊन जाताना गस्तीवरील पोलिसांनी पाहिले. त्या इसमांवर गस्तीवरील लोहमार्ग पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्या इसमांना अडवले. त्यांची चौकशी करून बॅगांची झडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा, पान मसाला आढळून आला. बंदी असतानाही गुटखाा बाळगल्या प्रकरणी आसिफ अब्दुल अजिज मर्चंट (४२, रा. भायखळा, मुंबई), दानिश मोहम्मद अस्लम कुरेशी (२९, रा. अरब गल्ली, मुंबई), सलमान सलिम शेख (२८, वरळी लोटस, मुंबई) यांच्यावर (गु. र. क्र. २६६/२०२१) भादंवि कलम २७३, १८८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम ५८, ५९ नुसार गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली.

    दरम्यान ही कारवाई मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबुब इमानदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील डोके, हवालदार एस. एफ . सोनावणे, हवालदार एस. व्ही. बने, पोलीस नाईक एन. एच.शेळके, पोलीस नाईक टी. ए. साळुंखे, पोलीस नाईक एस. टी. महाडिक, पोलीस नाईक एम. डी. पाटील, पोलीस नाईक ए. व्ही. वळवी, पोलीस अंमलदार वाय. एन. बच्चे व सुरक्षा बलाचे प्रभारी निरीक्षक नहार, हवालदार अजय पाल सिंग, हवालदार ज्ञानेश्वर गायकवाड, सीटी राजेंद्र गुर्जर, सीटी राधेश्याम मिना आदी पोलीस पथकाने केली.