संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य ंआणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य ंआणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ विचारवंत व तरुण भारतचे माजी संपादक मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मुंबई (Mumbai). महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ विचारवंत व तरुण भारतचे माजी संपादक मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

द्रष्टे विचारवंत, संपादक, निर्भीड लेखक व जाज्वल्य राष्ट्रप्रेमी श्री मा. गो. वैद्य यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.  वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसेच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केले. निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या मा गो वैद्य यांनी  आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेचले. ‘तरुण भारत‘चे संपादक असलेल्या वैद्य यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनाने विदर्भातील ज्ञानदीप मालविला आहे. श्री वैद्य यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.