राज्यपाल भगतसिंह कोश्यारी   आणि नाताळ सण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नाताळ सण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया व करुणेने परिपूर्ण भरलेल्या जीवनाचे स्मरण देतो. येशू ख्रिस्तांनी मानवतेच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले.

मुंबई (Mumbai).  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया व करुणेने परिपूर्ण भरलेल्या जीवनाचे स्मरण देतो. येशू ख्रिस्तांनी मानवतेच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले.

नाताळचा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेवून येवो, अशी मी प्रार्थना करतो. सर्वांना नाताळ तसेच आगामी वर्ष २०२१ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.