नरेंद्र मोदींचा स्किल इंडिया नावाचा कार्यक्रम फेल गेला काय? जयंत पाटील यांचा फडणवीसांना सवाल

मुंबई: कोरोना संकटात केंद्राकडून राज्य सरकारला भरीव मदत मिळाली. मात्र तरीही राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या आरोपांना आज महाविकास आघाडी सरकारनं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं.

फडणवीस यांनी केलेल्या विधानावरून जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारला. “देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, सर्व मजूर राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. त्या लोकांकडे असलेलं स्किल महाराष्ट्रातील लोकांकडं नाही. फडणवीसांनी महाराष्ट्रातील तरुणांना कमी लेखण्याचं काम केलं. राज्याच्या तरुणांमध्ये, जनतेमध्ये स्किल आहे. ते पूर्ण ताकदीनं ही कारखानदारी चालू करू शकतात, असा विश्वास आहे. जे गेले आहेत, ते परत येतील. पण, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कारखानदारी सुरू व्हावी, यासाठी महाराष्ट्रातील युवकांकडे स्कील आहे. स्किल इंडिया नावाचा कार्यक्रम नरेंद्र मोदी यांनी सुरू केला. तो फेल गेला की काय, असा प्रश्न निर्माण करणार विधान फडणवीस यांचं आहे. मागच्या पाच वर्षात स्किल इंडियानं काही स्किल दिली असतील, त्याचाही वापर झाला पाहिजे. पण, त्यावर फडणवीस यांचा विश्वास दिसत नाही,” असं म्हणत पाटील यांनी टीकास्त्र सोडले.
तसेच भारतात जर कुठे उत्तम काम झालं असेल तर ते मुंबई आणि महाराष्ट्रात झालेल आहे असे देखील त्यांनी सांगितले.