Havan best to annihilate Corona; Actress, MP Hemamalini claims

कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढ्यामध्ये आजवर भाजपाच्या अनेक ‘वाचाळवीर’ नेत्यांनी कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे अजब गजब दावे केले आहे. तर यातच आता अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमामालिनी यांनी असाच अजब दावा केला आहे. कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे हेमामालिनी यांचे म्हणणे आहे. हेमा मालिनी यांच्या मुंबईतील निवासस्थानी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हवन करण्यात आले, त्यावेळी त्यांनी हा दावा केला.

    मुंबई : कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढ्यामध्ये आजवर भाजपाच्या अनेक ‘वाचाळवीर’ नेत्यांनी कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे अजब गजब दावे केले आहे. तर यातच आता अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमामालिनी यांनी असाच अजब दावा केला आहे. कोरोना बचावासाठी हवन उपयुक्त असल्याचे हेमामालिनी यांचे म्हणणे आहे. हेमा मालिनी यांच्या मुंबईतील निवासस्थानी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हवन करण्यात आले, त्यावेळी त्यांनी हा दावा केला.

    भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मी धूप घालून हवन करत आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीवेळेस करते. या दोन्ही वेळेस धूपयुक्त हवन केल्याने गृहक्लेशही होत नाही. यामध्ये तूप, नीमची पाने आणि लोबान यांचा समावेश करावा असे म्हणाले.

    लोबान आणि अन्य सामग्रीमुळे आजार रोखण्यास मदत होते. तसेच धूपयुक्त हवनमुळे घरातील वातावरण शुद्ध होतं. मी रोज हवन करते, तुम्हीही करा असा सल्ला त्यांनी दिला.