पर्यावरणासाठी धोकादायक उपक्रमांना परवानगी नाही : उद्धव ठाकरे

पश्चिम घाट परिसंवेदनशील क्षेत्रामधून गावे वगळण्यापूर्वी वनविभागाने त्या गावांचा ड्रोन सर्व्हे करावा, तेथील वनेतर उपक्रमांची माहिती घेऊन अहवाल सादर करावा. जी गावे वाघ व वन्यजीवांच्या भ्रमण मार्गामध्ये किंवा वनक्षेत्रात येतात, त्यांचे इतरत्र पुनर्वसन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुंबई : पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या संवर्धन आणि संरक्षण करण्यास शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे तेथील पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांना हानी पोहचू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज पश्चिम घाट जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम घाटातील जैवविविधतेचे संवर्धन व संरक्षण करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. तेथील जंगल, वनसंपदा तसेच पर्यावरणाला कुठल्याही वनेतर उपक्रमांमुळे हानी पोहोचू देणार नाही. अशा प्रकराची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.