Decision to close international flights to Fofavatoy Corona, Saudi Arabia

भावेश यांनी विमान प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांसोबत कमांडरशीदेखील संवाद साधला. या कर्मचाऱ्यांनी त्यांना संपूर्ण विमानाची सफर घडविली. विमान प्रवासादरम्यान देण्यात येणाऱ्या सूचनादेखील विशेष होत्या. नेहमी विमानातील सर्व प्रवाशांना सूचना देण्यात येतात. मात्र या प्रवासावेळी माझ्यासाठीच सूचना दिल्या गेल्या आणि त्या विशेष होत्या. मिस्टर झवेरी तुमचा सीटबेल्ट बांधा. मिस्टर झवेरी आपण लँड होतोय, अशा सूचना विमानात ऐकू आल्या. हा अनुभव थक्क करणारा होता, असे भावेश यांनी सांगितले.

  मुंबई : कोरोनामुळे दररोज नव्या संकटांचा सामना करावा लागत आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना आता ब्लॅक फंगसची लागण होऊ लागली आहे. एका बाजूला कोरोनाने सगळ्यांची चिंता वाढवली असताना एका व्यक्तीला कोरोनामुळेच एक अविस्मरणीय अनुभव घेता आला. भावेश झवेरी नावाच्या व्यक्तीने मुंबई ते दुबई प्रवास विमानाने केला. विशेष म्हणजे यावेळी विमानात प्रवासी म्हणून फक्त भावेश झवेरी होते. बाकी संपूर्ण विमान रिकामे होते.

  अविस्मरणीय ठरला प्रवास

  भावेश झवेरी यांनी दुबईच्या तिकिटासाठी 18 हजार रुपये मोजले. मात्र 18 हजारात विमानातून एकट्याने प्रवास करण्याची संधी मिळेल असा विचार त्यांनी स्वप्नातही केला नव्हता. मात्र इमिरेट्सच्या बोईंग 777 या 360 आसनी विमानातील ते एकमेव प्रवासी होते. मी विमानात पाऊल ठेवताच हवाई सुंदरींनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले, असे भावेश झवेरींनी सांगितले. मी आतापर्यंत 240 हून अधिक वेळा मुंबई-दुबई दरम्यान प्रवास केला. मात्र हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

  फक्त भावेशसाठीच होत्या सूचना

  भावेश यांनी विमान प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांसोबत कमांडरशीदेखील संवाद साधला. या कर्मचाऱ्यांनी त्यांना संपूर्ण विमानाची सफर घडविली. विमान प्रवासादरम्यान देण्यात येणाऱ्या सूचनादेखील विशेष होत्या. नेहमी विमानातील सर्व प्रवाशांना सूचना देण्यात येतात. मात्र या प्रवासावेळी माझ्यासाठीच सूचना दिल्या गेल्या आणि त्या विशेष होत्या. मिस्टर झवेरी तुमचा सीटबेल्ट बांधा. मिस्टर झवेरी आपण लँड होतोय, अशा सूचना विमानात ऐकू आल्या. हा अनुभव थक्क करणारा होता, असे भावेश यांनी सांगितले.

  दुबईमधील निर्बंध

  भावेश गेल्या 20 वर्षांपासून दुबईचे रहिवासी आहेत. कोरोनाच्या संकटामुळे संयुक्त अरब अमिरातीने विमान प्रवासावर निर्बंध लादले आहेत. त्यानुसार दुबईचे नागरिक, गोल्डन व्हिसा असलेले नागरिक आणि राजदूतांनाच दुबईत येण्याची परवानगी आहे. सर्वसामान्यांना दुबईत प्रवेश नाही. त्यामुळे भावेश झवेरी दुबईला जाणाऱ्या विमानात एकटेच होते.