parth and ajit pawar

पार्थ पवार यांनी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी पार्थ पवारांना खडेबोल सुनावले होते. यामुले राष्ट्रवादीत पवार कुटुंबात वादंग झाल्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पुत्राची पाठराखण केली आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे  चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेमुळे राजकारणात गदारोळ माजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोठात चर्चांनी उसळी मारली आहे. पार्थ पवार यांनी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी पार्थ पवारांना खडेबोल सुनावले होते. यामुले राष्ट्रवादीत पवार कुटुंबात वादंग झाल्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पुत्राची पाठराखण केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, पार्थ अजून लहान आहे. हळूहळू तो तयार होईल. मात्र त्याला या प्रकरणावर सार्वजनिकरित्या खडेबोल सुनवणे योग्य नाही. असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. 

पार्थ पवारांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडल्यामुळे शरद पवारांनी पार्थ यांनी माध्यमांद्वारे खडेबोल सुनावले होते. यामुळे राजकारणात एकच खळबळ सुरु आहे. तसेच पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवारांनी आपले मत व्यक्त केले होते. तेव्हा शरद पवारही सोबत होते. परंतु पार्थ पवार यांच्या विषयी काय चर्चा झाली ह्या बाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही आहे.