sanjay raut

हिंमत असेल तर आरोप सिद्ध करावे. आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. फडतूस लोक आरोप करत आहेत. संबधीत पक्षाने आरोप करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. बघून घेऊ तुम्ही आहात आणि आम्ही देखील आहोत असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तल्य करत एक प्रकारचा इशाराच दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ईडी चौकशी बाबत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

हिंमत असेल तर आरोप सिद्ध करावे. आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही हे मी आधीच सांगितलं आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

फडतूस लोक आरोप करत आहेत. संबधीत पक्षाने आरोप करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. बघून घेऊ तुम्ही आहात आणि आम्ही देखील आहोत असेही संजय राऊत म्हणाले.

जी माहिती आयकर विभाग, सीबीआय, ईडीकडे नाही ती यांच्याकडे कशी येते? यावर कारवाई झाली पाहिजे. या खोट्या माहितीच्या आधारे हे लोक ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला.

PMC बँकेत आमचं खात देखील नाही. कुठला घोटाळा? त्याच्याशी आमचा काय संबध? असे म्हणत राऊतांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले आहेत.