केईएमचे अस्थिव्यंग विभागप्रमुख डॉ. एस. के. श्रीवास्तव निवृत्त

२००१मध्ये भुजमध्ये आलेल्या भीषण भूकंपानंतर गुजरातनंतर जखमींच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या डाँक्टरांच्या पहिल्या पथकात डॉ. श्रीवास्तव यांचा समावेश होता. केईएममध्ये प्राध्यापक ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते.

    मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ. एस. के. श्रीवास्तव रुग्णालयातील तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अलिकडेच निवृत्त झाले.

    केईएम हाँस्पिटलमध्ये डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी सतत गरीब व गरजू रुग्णांची सेवा केली. पाठीच्या मणक्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रीयेतील तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. मुंबईत गोविंदा उत्सवाच्या काळात थऱ रचताना अनेक गोविंदा पडून जखमी होतात. अशा अनेक जखमी गोविदांच्या मणक्यावर शस्त्रक्रीया करून त्यांना स्वतःच्या पायावर पुन्हा उभे केले आहे.

    २००१मध्ये भुजमध्ये आलेल्या भीषण भूकंपानंतर गुजरातनंतर जखमींच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या डाँक्टरांच्या पहिल्या पथकात डॉ. श्रीवास्तव यांचा समावेश होता. केईएममध्ये प्राध्यापक ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते.

    नव्या डाँक्टरांना व गरजू रुग्णांना आपल्या अनुभवनाचा व ज्ञानाचा फायदा देण्यासाठी डॉ. श्रीवास्तव यांनी के. जे. सोमैय्या मेडिकल काँलेज अँड रिसर्च इंस्टिट्यूटमधील अस्थिव्यंग विभागाचे प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे.