हिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आयोजन, कोरोना योद्ध्यांना केलं सम्मानित

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानामुळे डॉक्टर्स, परिचारिका आणि कार्यकर्ते तसेच हॉस्पिटल या सर्व लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावून सर्व रूग्णांची सेवा केली. तसेच काही लोकांना मरणाच्या दारातून वाचवलं, अशा कोरोना योद्ध्यांना अवॉर्ड देत हिंदी दैनिक नवभारतकडून सन्मानित करण्यात आलं आहे.

    मुंबई – हिंदी दैनिक नवभारतकडून हेल्थ केअर अवॉर्डचं आज (शनिवार) आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती.

    मागील वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना महामारीचं संकट वाढत आहे. यामुळे व्यापार, उद्योगधंदे आणि नागरिकांच्या जीवनावर प्रचंड प्रमाणात परिणाम झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोना व्हॅक्सिनची उपलब्धता नव्हती. त्यामुळे अनेक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

    परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानामुळे डॉक्टर्स, परिचारिका आणि कार्यकर्ते तसेच हॉस्पिटल या सर्व लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावून सर्व रूग्णांची सेवा केली. तसेच काही लोकांना मरणाच्या दारातून वाचवलं, अशा कोरोना योद्ध्यांना अवॉर्ड देत हिंदी दैनिक नवभारतकडून सन्मानित करण्यात आलं आहे.