‘आरोग्य प्रथम’ हीच सरकारची भूमीका विरोधकांना काय वाटते हा त्यांचा प्रश्न, सामनातून विरोधकांना खडे बोल

‘आरोग्य प्रथम आणि सण–उत्सव कोरोनानंतर, असे धोरण जर राज्य सरकारचे असेल तर ते योग्यच आहे. तरीही त्याकडे राज्य सरकारने डोळेझाक करावी आणि जनतेला तिसऱ्या लाटेच्या खाईत ढकलावे, असे विरोधकांना वाटते काय?’ असा सवाल विरोधकांना विचारण्यात आला आहे.

    सोमवारी दहीहंडी उत्सव मंडळांसोबत झालेल्या बैठकीनंतर ‘उत्सवाच्या उत्साहात आरोग्य जपा’ असे आवाहन केले. व, गोविंदा पथकांना दहीहंडीसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आता विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी आम्ही सण साजरे करणारच अशी भुमीका घेतली आहे. सरकारचा विरोध फक्त हिंदुंच्या सणालाच का? असा सवाल देखील सध्या विरोधी पक्षाकडून विकारण्यात येत आहे.

    विरोधकांच्या याच प्रश्नांना शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातू उत्तर देण्यात आलं असून ‘आरोग्य प्रथम आणि सण–उत्सव कोरोनानंतर, असे धोरण जर राज्य सरकारचे असेल तर ते योग्यच आहे. तरीही त्याकडे राज्य सरकारने डोळेझाक करावी आणि जनतेला तिसऱ्या लाटेच्या खाईत ढकलावे, असे विरोधकांना वाटते काय?’ असा सवाल विरोधकांना विचारण्यात आला आहे.

    काय म्हटलय सामनात?

    ‘आरोग्य प्रथम आणि सण–उत्सव कोरोनानंतर, असे धोरण जर राज्य सरकारचे असेल तर ते योग्यच आहे. कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडघम थेट नीती आयोगानेच अगदी स्पष्टपणे वाजविले आहेत. तरीही त्याकडे राज्य सरकारने डोळेझाक करावी आणि जनतेला तिसऱ्या लाटेच्या खाईत ढकलावे, असे विरोधकांना वाटते काय? त्यांना काय वाटते हा त्यांचा प्रश्न. राज्य सरकारची बांधिलकी कायम जनतेच्या आरोग्याशीच राहिली आहे आणि पुढेही राहील. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट गडद होत असताना ‘आरोग्य प्रथम, बाकीचे नंतर’ हेच धोरण ठेवावे लागेल.’

    दरम्यान, दहीहंडीचा उत्सव साजरा करणारच अशी भुमीका मनसेने व भाजप आमदार राम कदम, आमदार आशिष शेलार यांनी घेतली आहे.