rajesh tope

कोविड -१९ च्या (COVID -19) निदानासाठी सिटी स्कॅन अर्थात HRCT चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या चाचणीसाठी १० हजारांपेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आलं आहे. त्यामुळे दर निश्चितीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे.

मुंबई : सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा व परवडणाऱ्या दरात सिटीस्कॅन (HRCT)चाचणी खासगी रुग्णालयात मिळावी यासाठी सिटीस्कॅनचे कमाल दर निश्चित करणे संदर्भात समिती गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राजेश टोपे म्हणाले की, कोविड- १९ च्या (COVID -19) निदानासाठी सिटी स्कॅन अर्थात HRCT चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या चाचणीसाठी १० हजारांपेक्षा जास्त दर आकारण्यात येत असल्याचे निदर्शनास आलं आहे. त्यामुळे दर निश्चितीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतल्याचं राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे.

महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. असं असलं तरीही रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं आहे. दरम्यान राज्य सरकारने कोरोनाबाबतच्या इतर चाचण्यांचेही दर कमी केले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या निविदेत कोरोना चाचणीसाठी लागणारा आरटीपीसीआर किट, व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियम किट आणि व्हायरल आरएनए एक्स्ट्रॅक्श्न किटसह एकत्रित दर १४८ रुपये आला आहे.