dance in covid center

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये(Dance in Covid Center) आरोग्य कर्मचाऱ्यांची रुग्णांना आधार देण्यासाठी डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत आहे.

    गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोविड सेंटरमध्ये (Covid Center) आलेला रुग्ण हा बरा होऊनच घरी गेला पाहिजे यासाठी अनेक डॉक्टर जीवाची बाजी लावून सेवा देत आहेत. गेल्या वर्षभरापासून हे डॉक्टर तणावाखाली वावरत आहेत. मात्र मुंबईतील गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये(Dance in Covid Center) आरोग्य कर्मचाऱ्यांची रुग्णांना आधार देण्यासाठी डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये कोविड सेंटरमधले आरोग्य कर्मचारी सैराट चित्रपटातल्या झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.


    गोरेगावमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (bmc) कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. त्या गोष्टीला २ जून रोजी म्हणजेच बुधवारी १ वर्ष पूर्ण झालं. या निमित्तानं एक मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हे सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स पीपीई किट घालून सैराट चित्रपटातल्या झिंगाट गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हे सर्व कर्मचारी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.

    काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्ज-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रोहित पवार कर्जत तालुक्यातल्या गायकरवाडी इथल्या कोविड सेंटरमध्ये तिथल्या रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावरच ठेका धरताना दिसले होते.