अनिल देशमुखांविरोधात ढीगभर पुरावे; मनी लाँड्रिंग प्रकरणात 6000 पानांचे आरोपपत्र दाखल

देशमुख यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. देशमुख यांनी बडतर्फ पोलसि निरीक्षक सचिन वाझेच्या माध्यमातून मुंबईतील अनेक बार आणि पबमधून 4.7 कोटी रुपये गोळा केले असल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. वसुलीचे पैसे गोळा करण्याचे काम संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्यामार्फत करण्यात येत असल्याचे आरोपपत्रात उल्लेख आहे. वाझे सध्या अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तळोजा कारागृहात आहे. एनआयए याप्रकरणी त्यांची चौकशी करीत आहे.

    मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ईडीने देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि सहायक कुंदन शिंदेविरोधात 6000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. वसुलीचे पैसे जमा करुन त्या पैशांचे काळ्यामधून पांढऱ्यामध्ये रुपांतरित केल्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीने 26 जून रोजी पलांडे आणि शिंदे यांना 12 तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. त्यानंतर हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

    देशमुख यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. देशमुख यांनी बडतर्फ पोलसि निरीक्षक सचिन वाझेच्या माध्यमातून मुंबईतील अनेक बार आणि पबमधून 4.7 कोटी रुपये गोळा केले असल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. वसुलीचे पैसे गोळा करण्याचे काम संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्यामार्फत करण्यात येत असल्याचे आरोपपत्रात उल्लेख आहे. वाझे सध्या अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तळोजा कारागृहात आहे. एनआयए याप्रकरणी त्यांची चौकशी करीत आहे.

    ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी आतापर्यंत 5 वेळ समन्स पाठवले आहे. परंतु, अनिल देशमुख एकाही वेळेस चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे त्यांच्या जागी चौकशीसाठी हजर राहिले आहेत. ईडीने देशमुख यांच्या 12 ठिकाणांवर छापेमारी केली असून यामध्ये 4.2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात देशमुख यांना याप्रकरणी सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टानेही मोठा धक्का दिला होता.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]