Mumbai: Drugs party on a cruise; Shah Rukh's son's night in jail

मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खानच्या कोठडीची मुदत गरज पडल्यास वाढवण्यात येऊ शकते. त्यामुळे सध्या संपूर्ण देशाचं या प्रकरणाकडे लक्ष लागून आहे. आतापर्यंत आर्यन खानसह एकूण ८ जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

    मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या क्रुझवरील रेव्ह पार्टी आणि त्यांनतर एनसीबीकडून झालेल्या कारवाईमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. यामध्ये आर्यन खानला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे आर्यन सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आज आर्यनला जामीन मिळावा यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जाणार असून त्याच्या जामीनावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

    मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खानच्या कोठडीची मुदत गरज पडल्यास वाढवण्यात येऊ शकते. त्यामुळे सध्या संपूर्ण देशाचं या प्रकरणाकडे लक्ष लागून आहे. आतापर्यंत आर्यन खानसह एकूण ८ जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.रेव्ह पार्टीच्या प्रकरणानंतर एनसीबीने तात्काळ स्वरूपात सुत्रं हलवून मुंबईच्या वांद्रे, अंधेरी आणि लोखंडवाला परिसरात धाडी टाकून अंमली पदार्थ पुरवणाऱ्या एकाला ताब्यात घेतलं आहे. आज आर्यनला जामीन मिळणार का? आणि या प्रकरणात आणखी नेमका काय खुलासा होणार? याबाबत आता पाहाणे महत्वाचे ठरणार आहे