राज्यात पुढील २ दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज, विदर्भाला जाणवणार अधिक कडाका

राज्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत तापमानात कमालीची वाढ झालीय. दिवसाचं सरासरी तापमान २ ते ३ अंशांनी वाढलंय. आणखी दोन दिवस राज्यातल्या विविध भागांत तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामाान विभागनं वर्तवला आहे. 

    गेल्या काही दिवसांपासून राज्यातली थंडी गायब झाली असून अचानक उकाडा वाढला आहे. राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशांच्या वर पोहोचलं असून अंगाची लाही लाही व्हायला सुरुवात झालीय.

    राज्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत तापमानात कमालीची वाढ झालीय. दिवसाचं सरासरी तापमान २ ते ३ अंशांनी वाढलंय. आणखी दोन दिवस राज्यातल्या विविध भागांत तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामाान विभागनं वर्तवला आहे.

    वातावरणातील बदलामुळे आणि अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व विभागातील पाण्याची पातळी खालावल्याची माहिती हवामान विषयातले तज्ज्ञ देत आहेत. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. हवामानात अचानक आणि वेगानं होणाऱ्या बदलांचा भूजल पातळीवर परिणाम होत असतो. यंदा थंडी गायब होऊन कडाक्याचं ऊन पडण्याची क्रिया अत्यंत कमी कालावधीत घडल्यामुळे पाण्याची पातळीदेखील खालावली आहे.

    एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच इतकं कडक तापमान असेल, तर पुढचे दोन महिने काय होणार, या विचारांनीदेखील सर्वसामान्यांच्या अंगाची लाही लाही होत आहे.