iqbalsingh chahal

पहिल्या पावसातच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे(Water Logging) दिसून आले. या मुंबईतल्या पावसावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल(Iqbalsing Chahal Reaction) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई: आज मुंबईत(Mumbai) मुसळधार पाऊस(Heavy Rain) झाला आहे. पहिल्या पावसातच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे(Water Logging) दिसून आले. या मुंबईतल्या पावसावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल(Iqbalsing Chahal Reaction) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांनी म्हटलं आहे की,१२ तासांमध्ये १४० ते १६० मिली पाऊस झाला. २४ तासात ५०० मिली पाऊस झाला की अतिवृष्टी म्हणतात, पण एका तासातच १०० मिलीहून अधिक पाऊस झाला आहे.

    दहिसर सब वे, चुनभट्टी परिसरामध्ये पाणी साचलं आहे. हिंदमातामध्ये यावेळी ४ फूट उंचीचे रोड तयार केले असल्यामुळे प्रथमच हिंदमाताची वाहतूक थांबली नसल्याचं आयुक्तांनी सांगितलं. १४० कोटींचा भूमिगत प्रकल्प सुरू आहे. तिथे पाणी साचू देणार नाही. दीड किलोमीटरपर्यंत हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास ३० दिवस लागणार आहे. त्यामुळे त्यानंतर येथे कधीच पाणी साचणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ऑक्टोबरमध्ये प्रकल्प सुरू केला आता प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याचं ते म्हणाले.