पुढील पाच दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रात संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर, कोकण , मध्य महाराष्ट्र  आणि विदर्भातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि घाटमाथ्यावर पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.   

अहमदनगर जिल्ह्यातील घाटघर येथे विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पाऊस पडल्याने भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. तसेच भामरागड तालुक्यातील १८ गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासात कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे रत्नागिरीमधील वशिष्टी नदीला पूर आला आहे. त्याचप्रमाणे पुढील २४ तासांत पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.