मुसळधार पावसामुळे कुर्ल्यातील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून मुंबईत पाणी भरणे,दरड कोसळणे आणि जुन्या इमारती पडणे या घटना घडत असतात. परंतु आजच्या मुसळधार पावसामुळे, कुर्ला पश्चिमेला असलेल्या महापालिका कार्यालयासमोरील नेता

मुंबई – मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून मुंबईत पाणी भरणे, दरड कोसळणे आणि जुन्या इमारती पडणे या घटना घडत असतात. परंतु आजच्या मुसळधार पावसामुळे, कुर्ला पश्चिमेला असलेल्या महापालिका कार्यालयासमोरील नेता या इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. ही इमारत तीन मजली आहे. त्याचप्रमाणे इमारत जर्जर झाली असून, या ठिकाणी काही कुटुंब जीवावर उदार होऊन राहत आहेत. महापालिकेने येथील रहिवाशांना दोन दिवसांपूर्वीच इमारत रिकामी करण्याची नोटीस दिली होती. परंतु सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मदतकार्याला सुरूवात केली आहे.