मुंबई, कोकणसह ‘या’ भागात येत्या 4 दिवसात मूसळधार पावसाची शक्यता, हवामानाकडून अंदाज व्यक्त

हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार पुढील 3 दिवसांपर्यंत मुंबईतील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. 

    मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीचं संकट ओढावलं. त्यात आता शेतकरी आणि सर्वसामांन्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील विविध भागात मूसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

    हवामान खात्यानुसार, आजपासून (11जुलै) पुढील 4 दिवस पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात मुंबईसह, कोकण तसेच पुढील 4 दिवसात मूसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागात अति मूसळधार पाऊस पडू शकतो.

    हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार पुढील 3 दिवसांपर्यंत मुंबईतील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो.