पुढील 4 तासांत मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज, राज्यातील विविध भागात काय स्थिती? : जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत कालपासूनच पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. काल रात्री पावसाने अधिक जोर धरला असून आता पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

  मुंबई : मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत कालपासूनच पाऊस पडत असल्याचं दिसत आहे. काल रात्री पावसाने अधिक जोर धरला असून आता पुढील तीन ते चार तासांत मुंबईसह आसपासच्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात रात्रभर काही प्रमाणात हलका ते जोरदार पाऊस झाला.

  दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही भागांत पुढील तीन ते चार तासांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर आणि मुंबईच्या किनारपट्टीच्या भागात प्रचंड काळे ढग दिसून येत आहेत.

  पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा

  21 ऑगस्ट

  • कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
  • मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
  • मराठवाडा – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
  • विदर्भ – बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

  22 ऑगस्ट

  • कोकण – बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
  • मध्य महाराष्ट्र – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
  • मराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
  • विदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

  23 ऑगस्ट

  पुणे आणि आसपासच्या परिसरात काय स्थिती ?

  • 21 ऑगस्ट – आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • 22 ऑगस्ट – आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारी / संध्याकाळी आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे
  • 23 ऑगस्ट – आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.