येत्या ४ दिवसांत मंबईसह किनारपट्टी भागात अतिवृष्टीची शक्यता, सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा, कोणत्या जिल्ह्यांना झोडपणार ?

राज्यात (Maharashtra State) येत्या ४ दिवसांत मुंबईसह (Mumbai)  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) मुसळधार (Heavy Rain) पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांना (POLICE) सतर्क राहण्याते आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडून देण्यात आले आहेत.

राज्यात (Maharashtra State) येत्या ४ दिवसांत मुंबईसह (Mumbai)  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) मुसळधार (Heavy Rain) पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिसांना (POLICE) सतर्क राहण्याते आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडून देण्यात आले आहेत. तसेच १३ ऑक्टोंबर ते १७ ऑक्टोंबर (OCTOBER) या कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालवाधीत समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्यास सांगितले आहे.

कोणत्या जिल्ह्यांना झोडपणार ?

१४ ऑक्टोबर – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, सोलापूर, केल्हापूर, सातारा, सांगली. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद इत्यादी. जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.