rain

मागच्या आठवड्यात मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्राला व्यापलं असून अनेक ठिकाणी जोरदार मुंसडी मारली आहे. यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

    मुंबई: पहिल्या पावसातचं मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली होती. पण मागील दोन दिवसांपासून मुंबईला पावसानं विश्रांती दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण आज पुन्हा मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

    मागच्या आठवड्यात मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्राला व्यापलं असून अनेक ठिकाणी जोरदार मुंसडी मारली आहे. यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण आजपासून पुढील पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

    आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.