येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता, नेमकी पावसाची स्थिती कशी असणार?

राज्यांत येत्या 24 तासांत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, आजच्या दिवसासाठी यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

    मुंबई: येत्या 24 तासांत महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या वतीने हा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या शुभांगी भुते यांनी वर्तवली आहे.

    नेमकी पावसाची स्थिती कशी असणार?

    राज्यांत येत्या 24 तासांत उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, आजच्या दिवसासाठी यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

    19 ऑगस्टला पावसाची स्थिती कशी?

    19 ऑगस्टला महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, वाशिम, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर 20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.