मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस ; कोकणात ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई (Mumbai ) मुंबई उपनगरे आणि ठाण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून हवामान खात्याने कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबई : मुंबई (Mumbai ) आणि ठाण्यात (Thane) काल शुक्रवारपासून जोरदार पावसाने (Heavy rains ) हजेरी लावली आहे. तसेच आज देखील मुंबई, मुंबई उपनगरे आणि ठाण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून हवामान खात्याने कोकणात (Konkan) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरू असणारा पाऊस मुंबईत रात्री उशिरापर्यंत कायम राहिला. त्यामुळे मुंबई शहरात ५४.७८ मिलिमीटर तर पूर्व उपनगरांत ४३.५६ आणि पश्चिम उपनगरांत २६.३३ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांनाही काल दिवसभर पावसाने झोडपून काढले. कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून गोव्यासह, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ येथे ३० ऑगस्ट रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. अरबी समुद्रात ताशी ५५ किमी, वेगाने वारे वाहणार आहेत.