मुंबई उपनगरात मुसळधार पावसाने, सखल भागात पाणी, लोकल सेवा विस्कळीत!

पूर्व, पश्चिम उपनगरांत रविवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विक्रोळीत रस्त्यांना नदीचे रुप आले आहे. मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने याचा परिणाम हा वाहतूक व्यवस्थेवर झाला.

    मुंबई : रविवारी मुंबईत तडाखा दिल्यानंतर पावसाने आज उपनगरे आणिआजुभाजूच्या परिसरातही थैमान घातले आहे. त्याचवेळी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने गाड्या उशिराने धावल्या त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.

    प्रवासी अडकले
    पूर्व, पश्चिम उपनगरांत रविवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. विक्रोळीत रस्त्यांना नदीचे रुप आले आहे. मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने याचा परिणाम हा वाहतूक व्यवस्थेवर झाला. जोरदार पाऊसामुळे कोणतीही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना झाली नाही. त्यामुळे येथे प्रवासी अडकून पडले आहेत. कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरु आहे. डोंबिवलीच्या नेहरू रोडवर पाणी साचले असून दुकानामध्ये पाणी शिरले आहे. तर वसईत मुसळधार पाऊस सुरूच आहे.

    पर्यटकांची सुटका
    तानसा नदीने गाठली धोक्याची पातळी गाठली आहे. वसईतील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तर नवी मुंबईत पावसात अडकलेल्या ३७५ जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. आर्टिस्ट व्हिलेज धबधब्यात अडकलेल्या दोनशे पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अडवली-भूतवलीच्या ओढ्यापलीकडे शेतकरी अडकले होते, त्यांचीही सुटका करण्यात आली आहे.