मुंबई, ठाणे, पालघरसह मुसळधार पाऊस, राज्यासाठी हवामान खात्याकडून इशारा

आज दिवसभर पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागात मान्सून अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टी, घाट माथा, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

 मुंबई :  मुंबई, ठाणे आणि पालघरसह पुणे, विदर्भ, मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज दिवसभर पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागात मान्सून अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टी, घाट माथा, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. 

आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर विदर्भात येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. काही महत्त्वाच्या आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पुढील चार-पाच दिवसांत गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ८  टक्के जास्त पाऊस झाला आहे.