राज्यातील ‘या’ जिल्ह्यात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी

महाराष्ट्रात येणारे 24 तास हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं समोर आलं आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 

    मुंबई : महाराष्ट्रात येणारे 24 तास हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं समोर आलं आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

    दरम्यान त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या काही तासात नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, ठाणे, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

    हवामान विभागाने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे येणारे 24 तास हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तसेच सोमवारनंतर राज्यात हवामान कोरडे राहील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, दिवाळीतही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला असताना आता हा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. हवामानात अचानक बदल होत असल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. अचानक पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं व शेतमालाचं नुकसान होत आहे. त्यात पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.