Lalbagh household gas cylinder explosion accident; Two died and five were in critical condition

मुंबई : रविवारी लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिंलींडर स्फोट दृर्घटना घडली. या दुर्घटनेतील  मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले.

सिंलींडरचा स्फाेट झालेल्या दुर्घटनेत रविवारी उशिरा एकाच तर सोमवारी सकाळी दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाने सांगितले. केईएम रुग्णालयाचे एएमओ डाॅ. प्रवीण बांगर यांनी सांगीतले की, सिलेंडर स्फाेट दुर्घटनेतील दाेन जणांना मंगळवारी दुपारी घरी साेडण्यात आले.

मिहीर चव्हाण(२०) व प्र‌थमेश मुंगे(२७) अशी रुग्णांची नावे  आहेत. तसेच सध्या उपचार घेत असलेल्या आठ जखमींपैकी ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, दाेन जणांची प्रकृती स्थिर  आहे. यािशवाय मसिना रुग्णालयात दाखल असलेल्या चारही जणांची प्रकृती  चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.