sanjay raut

सप्टेंबर महिन्यापासून केंद्राने मदतीचा हात आखडता घेतला आहे. केंद्र सरकारकडून वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावर सुमारे साडेतीनशे कोटींचा अधिक बोजा पडणार आहे. असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पार गेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला पीएम केअर (PM care fund) निधीमधून मदत द्यावी. अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेत केली आहे. तसेच कोरोनाविरोधात लढाई (fight Corona) करताना कोणीही राजकारण आणू नये असे आवाहनही संजय राऊत यांनी केले आहे.

राज्यसभेत कोरोनाच्या साथीच्या नियंत्रणावर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे चर्चेत सहभागी होते. या चर्चेत संजय राऊत यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. यानंतर महाराष्ट्राला कोरोनाशी सामना करण्यासाठी पीएम केअर फंडातून मदतीची मागणी त्यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारकडे थकीत असलेला राज्याच्या वाट्याचा जीएसटीचा परतावा केंद्र सरकारने लवकर द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.