राज्यात काेराेनाची लपवा-छपवी ! काेराेनाने घेतले नऊ महिन्यात ४८ हजार बळी

मुंबई: राज्यातील काेराेनाचा विळखा दिवसेंदिवस सैल हाेत चालला आहे, मागील दाेन महिन्यांपासून राज्यातील काेराेना रुग्णसंख्या पाहता, बाधित रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे समाेर येत आहे, मागील पंधरा दिवसांपासून राज्यात दरराेज काेराेनाचे तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत, शिवाय काेराेनामुळे हाेणाऱ्या मृत्यूची संख्या देखील कमी हाेत आहे

मुंबई: राज्यातील काेराेनाचा विळखा दिवसेंदिवस सैल हाेत चालला आहे, मागील दाेन महिन्यांपासून राज्यातील काेराेना रुग्णसंख्या पाहता, बाधित रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे समाेर येत आहे, मागील पंधरा दिवसांपासून राज्यात दरराेज काेराेनाचे तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत, शिवाय काेराेनामुळे हाेणाऱ्या मृत्यूची संख्या देखील कमी हाेत आहे. दरराेज घटत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आराेग्य विभागाचा ताण कमी हाेत असून काेराेनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यताही आराेग्य विभागाने नाकारली आहे.

असे असतानाही, राज्यात मागील नऊ महिन्यात मात्र काेराेनाने आतापर्यंत तब्बल ४८ हजार ४९९ लाेकांचा बळी घेतला आहे. याशिवाय १,११४ लाेकांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच राज्यात आतापर्यंत तब्बल १८ लाख ८४ हजार ७७३ लाेक काेराेनाने बाधित हाेते. यापैकी १७ लाख ७४ हजार २५५ रुग्ण बरे झाले. तर राज्यात ६० हजार ९०५ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, येत्या काही दिवस रुग्णसंख्या कमी हाेणार असल्याचेही वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याची आर्थिक राजधानी मुंबई शहर मागील नऊ महिन्यांपासून काेराेनामुळे ठप्प झाली आहे. या आर्थिक राजधानीत काेराेनाने आतापर्यंत ११ हजार ०१३ बळी घेतले आहेत, यापैकी ८४१ रुग्ण इतर कारणामुळे मृत्यू झाले आहेत, तर २,८४,९९० बाधित रुग्ण सापडलेत, यापैकी २,६६,११२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ७०२४ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

राज्य आराेग्य विभागाने जिल्हा,महानगरपािलकाप्रमाणे, रुग्णांची नाेंद ठेवण्यात आली असून यात राज्यातील ६१ जिल्ह्याची वर्गवारी करत आठ मंडळ तयार करण्यात आलेत, यात मागील नऊ महिन्यात आतापर्यंत मुंबईत ११०१३ लाेकांचा मृत्यू झाला, तर ठाणे मंडळ अंतर्गत (११ महानगरपािलका)७७७८ लाेकांचा मृत्यू झाला. नाशिक मंडळ अंतर्गत (१० महानगरपालिका) ४७६५, पुणे मंडळ (६ महानगरपालिका) ११११४, काेल्हापूर मंडळ (६ जिल्हे) ३९२८, अाैरंगाबाद मंडळ (६ मनपा) १८१३, लातूर मंडळ (६ मनपा)२३५१, अकाेला मंडळ (७ मनपा) १४५६, नागपूर मंडळ (८ िजल्हा)४१८४ यािशवाय इतर राज्य/ देश १२७ मृत्यू झाल्याची माहिती आराेग्य विभागाकडून देण्यात आली.

सिंधुदुर्ग -१५४, नंदूरबार- १६५,हिंगोली – ९०, गाेंदिया-१४२, गडचिराेली -७३ अािण वािशम -१४९ या जिल्ह्यांमध्ये काेराेना मृत्यू कमी झाले असल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली आहे.