सिटी सहकारी बँक घोटाळा : अडसूळ यांना हायकोर्टाचा झटका; चौकशी विरोधातील याचिका फेटाळली

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असलेल्या अडसूळ यांनी हजारो खातेधारकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकेच्या खातेदारांमध्ये गिरणी कामगार, डबेवाले, सर्वसामान्य लोक, निवृत्ती वेतनधारकांचा यांचा समावेश आहे. यातील 90 टक्के खातेदार मराठी आहेत.

    मुंबई (Mumbai). शिवसेनेचे नेते (Shiv Sena leader) आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांना दुसरा धक्का बसला आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा (City Co-operative Bank scam) प्रकरणात ईडीने (E.D.) सुरू केलेल्या चौकशी विरोधात अडसूळ यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता अडसूळ यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीने (Enforcement Directorate) अडसूळ यांच्या मुंबई व अमरावती (Mumbai and Amravati) येथील घरी छापे टाकले होते. तसेच, चौकशीसाठी ईडीने अडसूळ यांना समन्स बजावले होते. मात्र, तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

    सेशन्स कोर्टात जाण्याची सूचना (Notice to go to sessions court)
    दरम्यानच्या काळात अडसूळ यांनी ईडीच्या चौकशीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने पाठवलेले समन्स रद्द केले जावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, अडसूळ यांची विनंती हायकोर्टाने फेटाळली. तसेच, मुंबई सेशन्स कोर्टात रीतसर अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना अडसूळ यांना केली.

    हजारो खातेधारकांची फसवणूक (Fraud of thousands of account holders)
    सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असलेल्या अडसूळ यांनी हजारो खातेधारकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकेच्या खातेदारांमध्ये गिरणी कामगार, डबेवाले, सर्वसामान्य लोक, निवृत्ती वेतनधारकांचा यांचा समावेश आहे. यातील 90 टक्के खातेदार मराठी आहेत. अडसूळ यांनी 20 टक्के कमिशन घेऊन बिल्डरांना नियमबाह्य कर्ज दिले. त्यामुळे बँक बुडाली असून यात जवळपास 980 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात सध्या अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहे.