cm school Reopen

  • लॉकडाऊनमुळे सर्वच प्रकारच्या व्यवसाय आणि उद्योग तसेच चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला होता. राज्याचेही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अनलॉक च्या योजनेत राज्य सरकारने सर्व प्रकरच्या शुटिंगला परवानगी देत ६५ वर्षांच्या वरील कलाकारांना, टेक्निशियन आणि इतर संबंधितांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर अनेक ज्येष्ठ कलाकारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

मुंबई : देशात कोरोनाचा प्रकोप वाढला होता. त्यामुळे देशासह राज्यांत मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा लॉकडाऊन करण्यात आला होता. परंतु लॉकडाऊनमध्ये ३१ मे रोजी शिथीलता देण्यात आली होती. आणि अनलॉक करण्याबाबतची अधिकार राज्यसरकारला देण्यात आले आहेत. 

लॉकडाऊनमुळे सर्वच प्रकारच्या व्यवसाय आणि उद्योग तसेच चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला होता. राज्याचेही आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अनलॉक च्या योजनेत राज्य सरकारने सर्व प्रकरच्या शुटिंगला परवानगी देत ६५ वर्षांच्या वरील कलाकारांना, टेक्निशियन आणि इतर संबंधितांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर अनेक ज्येष्ठ कलाकारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. तसेच या निर्णयावर कलाकारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने ६५ वर्षांवरील कलाकारांना शुटिंगसाठी परवानगी देत राज्य सरकारचा नियम रद्द केला आहे. तसेच उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले देखील आहे. 

अनलॉक दरम्यान राज्य सरकारने सिनेसृष्टीसाठी मार्गदर्शक सुचना जारी करत शुटिंगला परवानगी दिली होती. परंतु त्यात ६५ वर्षांवरील कलाकारांना तसेच इतर संबंधित कर्मचाऱ्यांना परवानगी दिली नव्हती. यामुळे ज्येष्ठ कलाकारांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी कलाकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तसेच राज्य सरकारच्या निर्णयात बदल केला आहे. तसेच ६५ वर्षांवरील कलाकारांना शुटिंगला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.