Best's fleet will include state-of-the-art double decker buses; Sophisticated facilities with two doors, two stairs, CCTV cameras

मुंबई : मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून आता मुंबईत केवळ ४४८ गंभीर रूग्ण आहेत. तर ७६५० सक्रिय रूग्ण राहिले आहेत. मुंबईत मार्च महिन्यात कोरोनाने धुमाकुळ माजवला होता. परंतु, आता कोरोनाची वापसी होत असल्याचे चित्र आहे. मुंबईत सध्या केवळ ७६५० काेरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. केवळ अडीज हजार रूग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसून येत आहेत.

मुंबईत आतापर्यंत एकूण २ लाख ६९ हजार २९१ रूग्णांवर काेरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे पालिकेकडून खबरदारी सुरू असून हाय रिस्क गटातील लोकांची चाचणी सुरूच ठेवली आहे. त्या अनुषंगाने पालिकेने केलेल्या दोन लाख जणांच्या चाचणीतून केवळ २ हजार जण पॉझिटिव्ह आढळले.

राज्य सरकारने कोरोनाचा सामना करण्यासाठी आता तपासणीवर जास्त भर दिला आहे. सरकारने स्थ्ाानिक पालिका व जिल्हाधिकाऱ्यांना शक्यतो सुपर स्प्रेडर्स अर्थात बस वाहक-चालक, भाजीपाला विक्रेते, हॉकर्स यांच्या तपासणीवर जोर देण्याचे निर्देश दिले आहेत. हे घटक सर्वांच्या संपर्कात सातत्याने येत असतात, त्यामुळे यांच्यापासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या सुपर स्प्रेडर्सची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर या घटकातील एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळला तर तो शेकडो जणांना बाधित करू शकतो. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यास काही काळ जातो. जेमतेम आठवडाभर लक्षणे दिसून येत नाहीत, त्यानंतर लक्षणे दिसायला लागतात. मात्र या आठवड्याभरात कित्येक जणांना सुपर स्प्रेडर्स बाधित करतील. त्यामुळे खबरदारी म्हणून सुपर स्प्रेडर्सची तपासणी करण्यावर जोर देण्यासाठी सांगण्यात आले आहे.

अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगीतले की, आम्ही दिवाळीपूर्वीच हाय रिस्क लोकांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विक्रेते जर एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला तर तो स्वत:ही बाधित होईल, आणि इतरांनाही बाधित करेल. त्यामुळे आता तपासणीच्या माध्यमातून कोण सुरक्षित आहेत आणि कोण बाधित आहेत, याची माहिती मिळू शकेल. कोरोनाला टाळायचे असेल तर सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या नियमांचे पालन हे करायलाच हवे, असे त्यांनी सांगीतले.

रिकव्हरी रेट ९३ टक्के

मुंबईत आतापर्यंत एकूण २ लाख ८९ हजार २०४ रूग्ण आढळले. सध्या रूग्णांचा रिकवरी रेट ९३ टक्के आहे. कोरोनापासून बरे होणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. २४ नोव्हेंबरला वृद्धीदर ०.३२ टक्क्याहून ०.१९ टक्क्यावर आला आहे. कोरोना रूग्णांमध्ये घट दिसून आले आहे. त्यामुळेच कोरोना रूग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. मुंबईत कोरोना चाचणीत ३५ टक्के रूग्ण आढळत होते. आता हा दर ४ टक्क्यांनी घसरला आहे. दररोज आढळणाऱ्या रूग्णांचीही संख्या कमी होत आहे. मुंबईत आतापर्यंत २२ लाख ६५ हजार ६३५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी १२.७३ टक्के पॉझिटिव्ह आढळून आल्या. सध्या मुंबईत ७६५० सक्रिय रूग्ण्ा असून त्यापैकी ४,५०६ रूग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत. तर २,६९६ रूग्णांमध्ये लक्षणे आढळून आले होते, परंतु, तेही स्वस्थ आहेत.

सध्या पालिका दररोज सुमारे २० ते २२ हजार जणांची आरटीपीसीआर आणि रॅपिड टेस्टिंग करत आहे. सुमारे ४० ते ५० टक्के हाय रिस्क मुंबईकरांची तपासणी होत आहे. हाय रिस्क मुंबईकरांना शोधून वेळेतच त्यांची चाचणी केली जात आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.